Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आरोग्य जागर आयुर्वेद

इम्यूनिटी पावर वाढवणारे गुडूची

डॉ सौरभ कदम

by प्रभात वृत्तसेवा
December 1, 2022 | 9:03 am
A A
इम्यूनिटी पावर वाढवणारे गुडूची

मोठ्या झाडांवर हिची वेल पसरलेली असते. त्यात कडुनिंबाच्या झाडावर वाढणारी अमृता अधिक औषधी गुणांनी युक्‍त असते. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत तर सापडतेच सापडते. कारण ही साक्षात अमृतरुपी वनस्पती. अमर आहे ही वेल. मरतच नाही. तुकडे तुकडे करा, वाळू द्या, एवढं करून थोडा गारवा मिळाला की पुन्हा फुटवे फुटू लागतात आणि बहरते.

ह्या वेलीचं कांड कापलं असता चक्राप्रमाणे दिसतं. त्यातली छोटी छोटी रंध्रे खुप सुंदर दिसतात. औषधात वापरताना या वेलीचं साधारण आपल्या बोटा एवढं जाड कांड घेतात. त्याचा ताजा स्वरस, चेचून पाण्याबरोबर काढा करून किंवा कांड सावलीत वाळवून बनवलेलं चुर्ण करा. हिचं गुळवेल सत्वही काढतात. जे अनेक प्रकारच्या तापामध्ये, मधुमेहामध्ये, जुनाट आजारात कामी येतं.
शरीरातील पेशींच्या (ज्यांना सप्त धातू म्हणतो) चयापचय क्रियेत झालेल्या बिघाड होऊन उद्‌भवलेल्या आजारांवर दिल्या जाणाऱ्या बहुतांश औषधींमध्ये गुडूची असतेच. रोगप्रतिकार शक्‍तीचे काम बिघडून बनलेले आजार ज्याला आपण ऊळीशरीश म्हणतो त्यावर तर ती रामबाण आहे.

वयस्था म्हणजे वयस्थापन करणारी, रसायनी म्हणजे आयुष्य वाढवणारी, अशी ही नावे गुडूचीच्या उपयुक्‍त गुणांनुसार दिली आहे.
हिच्या पानांची भाजी करून ही खाल्ली जाते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी बनवतात. त्यात शेंगदाण्याचं कूटही टाकलं जातं. बनलेली भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. चवीला कडू असली तरी अत्यंत औषधी आहे. गावोगावाच्या जुन्या वयोवृद्ध वैद्यांचे आहार स्वरूप पाहिल्यावर लक्षात आलं की महिन्याला हे वैद्य या गुळवेलाच्या पानांची भाजी आपल्या आहारात ठेवतातच. आदिवासी लोकही हिचा भाजी म्हणून वापर करतात.

वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांमध्ये झालेला बिघाड नाहीसा करून, शरीरातील चयापचय उत्तम प्रकारे करवून, रोगप्रतिकार शक्‍ती वाढवून आरोग्यप्राप्ती करून देणारी ही वेल आहे.
आपल्या आसपास गुळवेल मिळत असेल किंवा आयुर्वेदिक औषधींच्या दुकानात गुडूची चुर्ण मिळत असेल तर तिच्यापासून पुढे सांगितल्याप्रमाणे काढा बनवून घ्या.

काढा बनवण्याची पद्धत
घटक द्रव्य
गुडूची
ताजी असेल तर- किमान हाताच्या बोटां एवढे जाड, साधारण 5 ते 6 सेंटीमीटर लांब कांड खलबत्त्यात चेचून घ्या. किंवा गुडूची चुर्ण असेल तर 1 सपाट चमचा चुर्ण घ्या.

हळद, सुंठ, धने, जिरे, ओवा सर्व चुर्ण करून एकत्र करू घ्या आणि त्या सर्वांच्या चूर्णाचा अर्धा चमचा काढा बनवण्यासाठी घ्या.
वरील दोन्ही चुर्ण औषधी 2 कप पाणी एका भांड्यात घेऊन त्यात मिसळा.गॅसच्या मध्यम आचेवर काढा करायला ठेवा. आटून अर्धा कप शिल्लक राहिल्यावर गाळून प्या. दिवसातून दोन वेळा सकाळी उपाशीपोटी व संध्याकाळी (अगोदर दोन तास काहीही न खाल्लेल्या अवस्थेत) साधारणपणे 5 ते 6 वाजेच्या दरम्यानघ्या. मधुमेह किंवा रक्‍तशर्करा नसणाऱ्यांनी चमचाभर साखर किंवा गूळ टाकून पिऊ शकता.

काढा घेतल्यानंतर पुढे किमान अर्धा तास काहीही खाऊ पिऊ नका. गरम पाणी पिणे, पचायला हलका व ताजा गरम गरम आहार घेत, शारीरिक व मानसिकरित्या चांगली विश्रांती घेत किमान सलग 21 दिवस हा काढा घ्या. उत्तम रोग्यप्रतिकारक शक्‍ती प्राप्त होईल.

गुडूची, गुळवेल, गिलोय, चक्रलाक्षणिका, रसायनी, वयस्था, मधुपर्णी, छिन्नोद्‌भवा, वत्सादनी, अमरवेल अशा अनेक नावांनी आपण गुडूची ओळखतो. संपूर्ण भारतभर सर्वत्र मुबलक प्रमाणात सापडते. आम्हा शेतकऱ्यांच्या बांधाला किंवा अडचणीच्या कोपऱ्यात तर हमखास सापडते. ही कोणती वनस्पती आहे, जाणून घेऊया.

Tags: aarogya newshelath newshelath tipsMAHARASHTRApune newstop news

शिफारस केलेल्या बातम्या

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह
latest-news

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

37 mins ago
योगी सरकारचा मोठा निर्णय.! यापुढे खाजगी शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एकीची फीस सरकार भरणार
latest-news

योगी सरकारचा मोठा निर्णय.! यापुढे खाजगी शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एकीची फीस सरकार भरणार

1 hour ago
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे कृतज्ञता पुरस्कार जाहीर
latest-news

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे कृतज्ञता पुरस्कार जाहीर

2 hours ago
Republic Day 2023 : बलशाली महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प करूया – राज्यपाल कोश्यारी
महाराष्ट्र

Republic Day 2023 : बलशाली महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प करूया – राज्यपाल कोश्यारी

16 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

मुलाच्या आजारपणामुळे टेंशनमध्ये असलेल्या भाजप नेत्याने कुटुंबासह विष घेत केली ‘आत्महत्या’

Nasal Vaccine: भारत बायोटेकची नाकातून दिली जाणारी कोविड लस लाँच, ‘इतकी’ आहे किंमत

खळबळजनक! शिंदे-फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रणच नव्हते”; नाना पटोले यांची माहिती

योगी सरकारचा मोठा निर्णय.! यापुढे खाजगी शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एकीची फीस सरकार भरणार

आज निवडणुका झाल्या तर मोदी लाट चालेल का? कोणाला किती नफा किती तोटा, जाणून घ्या, युपीएची अवस्था

Most Popular Today

Tags: aarogya newshelath newshelath tipsMAHARASHTRApune newstop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!