मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सध्याचे राज्यातील वातावरण पाहता राज ठाकरे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्षावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंनी आपण पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर सर्वांनाच राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.
अश्यातच, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरेंच्या सभेतील महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला असून, राज ठाकरे यांची सभेसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले.., “राज ठाकरे काय बोलणार हे आम्हलाही माहिती नाही. गेल्या दिवसाआधी भोग्यांबाबत मनसेने भूमिका घेतली होती. मात्र पुन्हा हे भोंगे पुन्हा सुरू झाले आहेत.
त्यामुळे त्यावर ते काय भूमिका घेतली हे तेच सांगतील. राज्यभरातुन मनसैनिक येणार आहेत. राजसाहेबांचा विचार ऐकणार आहेत आणि पुढची दिशा ही ठरवणार आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राजसाहेब बोलतील असं वाटतं..’ असं देखील राजू पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान, आज शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची ही सभा होणार असून, मनसैनिकांनी देखील याची जोरदार तयारी केली आहे.
मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याचा टीजर चर्चेत…
॰॥ ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व ॥॰#मनसे_पाडवामेळावा #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/tNNFDn16nf
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 17, 2023
मनसेच्या अधिकृत सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात आलेल्या टीजरमध्ये राज ठाकरेंच्या भाषणातील एक डायलॉग वापरण्यात आला आहे. “ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व” या टॅगलाईन खाली हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. “हिंदू ही दोन अक्षरे जगा, मराठी या तीन अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा, राज ठाकरे ही पाच अक्षरे नेहमीच पाठीशी असतील असा टीजरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.