मुंबई : मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सध्याचे राज्यातील वातावरण पाहता राज ठाकरे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्षावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंनी आपण पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर सर्वांनाच राज ठाकरे नेमक काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.
आज गुढी पाडवाही असल्याने मनसेने शिवसेना भवन आणि दादर परिसरात प्रचंड बॅनरबाजी केली आहे. अशात मनसेने लावलेले एक पोस्टर सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेना भवनासमोरील लावलेले हे पोस्टर राजकारण तापणार आहे. या पोस्टरमध्ये राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शिवसेना भवनासमोर लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये महाराष्ट्रातील जनतेचे भावी मुख्यमंत्री… हिंदूंचे लोकनेते राजसाहेब ठाकरे… हा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॅनरवर राज ठाकरे यांचा मोठा फोटो आहे. भगवी शाल अंगवार पांघरलेला राज ठाकरे यांचा हा फोटो आहे. आणि तर खाली लक्ष्मण पाटील यांचाही फोटो आहे. या बॅनरवरून सध्या राजकारण तापणार असल्याचे दिसत असले तरी उद्धव ठाकरे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे आता सर्वांनाच लक्ष लागले आहे,