मांजरी : पुणे, पिंपरी- चिंचवड मध्ये राज्याच्या विविध ग्रामीण भागातून येऊन व्यावसायिक होणारे शहरांच्या प्रगतीला हातभार लावत आहेत, तसेच हॉटेल व्यवसायामध्ये मराठी युवकांचा टक्का सध्या वाढत असून ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे ,असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
मांजरी फॉर्म येथील रुबाब फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले . त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रकाश मस्के, माधव काळभोर, माणिकराव सातव नगरसेवक गणेश ढोरे, सागर हरपळे आदीजण या प्रसंगी उपस्थित होते.
या वेळी हॉटेलचे संचालक अशोक शिंदे, आर्किटेक्ट अतीत अदमुलवार, रोहन न्हावले, आनंद कासवा, डॉ. केतन कुंभार आदी या प्रसंगी उपस्थित होते. अशोक शिंदे यांनी स्वकष्टातून पुढे येत हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे, शून्यातून सुरुवात करणाऱ्यांना अपयश कधीच येत नाही आणि त्यांचे पाय कायम जमिनीवर राहतात याचा मला अनुभव आहे. अशोक शिंदे हे यातील एक तरुण आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी काढले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम शेवाळे यांनी प्रास्ताविक केले.तर माजी सरपंच अशोक शिंदे यांनी सर्वांचे स्वागत आणि आभार मानले.