भोर – भोर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार रविवारी (दि. 22) पासून बंद असले तरी नागरिक औषध आणि किराणा मालाच्या दुकानांसह, भाजीभाला खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे भोर नगरपालिका प्रशासनाने बुधवार (दि. दि.25) ते मंगळवार (दि. 31) पर्यंत दिवसाआड किराणामालाचे दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दुकानदारांना दिले आहेत. तर भाजीपाला खरेदी फक्त भोर नगरपालिकेच्या महात्माफुले भाजी मंडईतच केली जाईल, असे जाहीर केले आहे.
भोरमध्ये मटण, चिकन खरेदीसाठी सचारबंदी कायद्याचा भंग करून ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. वाहतूक व्यवस्था पोलिसांनी बंद केली असली तरी काही टोळभैरव दुचाकीवरून बोंबलत फिरत असल्याने पोलिसांनी भोरमधील पेट्रोल पंपचालकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पेट्रोल विक्री अत्यावाश्यक सेवा पुरवणाऱ्यांशिवाय कोणालाही वितरीत करू नये, असे आदेश तहसीलदारांनी पेट्रोलपंचालकांना दिला आहे.
दरम्यान, सोमवार (दि. 24) पासून भोर पोलीस, तालुका पत्रकार संघ, आणि प्रशासनाने भोर शहराची नाकेबंदी केली असून बाहेर गांवाहून येणाऱ्यांची नोंद घेण्यास सुरुवात केली आहे तर ग्रामीण भागातील तरुणांनी गांवचे प्रवेशाद्वार बंद केली आहे.