‘बाबा’ सिनेमातून संजय दत्तचे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल

मुंबई- संजूबाबा अर्थात बॉलिवूडचा अभिनेता ‘संजय दत्त’ आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. नुकतंच संजय दत्तने आपल्या आगामी ‘बाबा’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. संजय दत्तने ट्विटर अकाऊंटवरून आपल्या आगामी मराठी चित्राबद्दल एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील देखील काही चेहेरे प्रेक्षकांना दिसणार आहेत. नंदिता धुरी-पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी हे यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच, ‘बाबा’ चित्रपटात अभिनेता दीपक डोब्रियाल मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राज गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.