नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळीकडे तांडव सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू आणि कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल तर होताच आहेत पण सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. या फोटोत एक पोलीस हॅंडपंपने एका तहानलेल्या कुत्र्याला पाणी पाजताना दिसत आहे. पोलिसाच्या याच माणुसकीमुळे हा फोटो व्हायरल झाला आहे. या पोलिसाचे लोक भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.
If a man loves dogs, he is a good man.
If dogs love a man, he is a good man.!Incredible Banaras..! pic.twitter.com/Wu4e6KVxdd
— Sukirti Madhav Mishra (@SukirtiMadhav) May 7, 2021
हा फोटो आयपीएस अधिकारी @SukirtiMadhav यांनी ट्विटवर शेअर केलाय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जर एक व्यक्ती कुत्र्यावर प्रेम करत असेल तर ती एक चांगली व्यक्ती आहे. सोबतच जर कुत्रा माणसावर प्रेम करत असेल तरीही तो चांगला आहे. अतुल्य बनारस!’. त्यांचं हे ट्विट व्हायरल झालं आहे.
If a man loves dogs, he is a good man.
If dogs love a man, he is a good man.!Incredible Banaras..! pic.twitter.com/Wu4e6KVxdd
— Sukirti Madhav Mishra (@SukirtiMadhav) May 7, 2021
हे आर्टिकल लिहून होईपर्यंत याला ७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि सहाशेपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. सोबतच अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.
If a man loves dogs, he is a good man.
If dogs love a man, he is a good man.!Incredible Banaras..! pic.twitter.com/Wu4e6KVxdd
— Sukirti Madhav Mishra (@SukirtiMadhav) May 7, 2021