साजिद नाडियादवाला सलमानला घेऊन “कभी ईद, कभी दिवाली’ नावाचा सिनेमा करतो आहे. पण आता या सिनेमाचे शीर्षक बदलण्याचे साजिद नाडियादवालाने ठरवले आहे. आता साजिदने या सिनेमाचे शीर्षक “भाईजान’ असे ठरवले आहे. सलमान हिरो असल्यामुळेच या सिनेमाचे नाव बदलून “भाईजान’ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. “भाईजान’ हे नाव सलमानच्या सिनेमाला एकदम परफेक्ट आहे.
सलमानच्या सिनेमाला हेच शीर्षक योग्य न्याय देऊ शकेल, असे साजिद नाडियादवालाला वाटले. म्हणून सलमानबरोबर चर्चा करून हा निर्णय घेतला गेला. या आगामी सिनेमात सलमानबरोबर पूजा हेगडेही लीड रोलमध्ये दिसणार आहे. सलमान आणि पूजा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. याशिवाय आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल हेदेखील महत्त्वाच्या रोलमध्ये दिसतील.
“टायगर 3′ चे शूटिंग संपल्यानंतर सलमान “भाईजान’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत “राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’देखील रिलीज झाला असेल. त्यामध्येही “भाई’ शब्द असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर “भाईजान’ ठसवण्यासाठी मदतच होणार आहे. आतापर्यंत “भाईजान’ हे सलमानचे टोपण नाव होते. पण ते आता अधिकृत टोपण नाव बनणार आहे.