लंडन -उदयोन्मुख अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला आपला प्रभावी आयपीएल फलंदाजीचा फॉर्म भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कायम ठेवायचा आहे आणि 20 षटकांच्या फॉरमॅटमध्ये बदल झाल्यामुळे त्याला त्याच्या आक्रमक स्वभावाला आळा घालण्याची गरज नाही, असे ग्रीनला वाटते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी विजेतेपदाची अंतिम लढत बुधवार दि. 7 जून रोजी ओव्हल येथे सुरू होईल.
या वर्षीच्या आयपीएलमध्ये ग्रीनने 16 डावांत 452 धावा झोडपल्या. ज्यामध्ये 47 चेंडूंतील एका शतकाचाही समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये गेला होता. या वर्षाच्या सुरुवातीला अहमदाबाद येथे मार्चमध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत त्याने आक्रमक 114 धावा फटकावल्या होत्या.
ग्रीन म्हणाला की, गेल्या वर्षी डाव सुरू करताना मी संघाची धावसंख्या पाहात असे आणि आपण आक्रमक खेळायचे की बचावात्मक हे ठरवत असे. मात्र, आयपीएलने मला असा आत्मविश्वास दिला आहे की, आपण आपला नैसर्गिक म्हणजेच आक्रमक खेळ सोडायचा नाही. पाहण्याऐवजी थोडा जास्त बचाव करू पाहात असे. अन्यथा खराब चेंडू सीमापार टोलवण्याची संधीही हुकू शकते.
इंग्लंडमधील ही एक खेळपट्टी आहे जिथे दोन फिरकीपटू खेळवण्याकडे कर्णधाराचा कल असतो. चेंडू वळला की फिरकीपटूंनाही उसळी मिळते. माझ्या मते विकेट सपाट असेल. अशा परिस्थितीत भारताने दोन फिरकीपटू (आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा) खेळवल्यास ते अनुकूल होईल. आम्ही याआधीच ऑस्ट्रेलियाला फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना पाहिलं आहे, विशेषत: भारताविरुद्ध.
– मॉंटी पनेसर, इंग्लंडचा निवृत्त फिरकी गोलंदाज
ओव्हलवरील शतकवीर
विजय मर्चंट, 128, 17 ऑगस्ट 1946
सुनील गावसकर, 221, 4 सप्टेंबर 1979
रवी शास्त्री, 187, 23 ऑगस्ट 1990
कपिलदेव, 110, 24 ऑगस्ट 1990
राहुल द्रविड, 217, 8 सप्टेंबर 2002
अनिल कुंबळे, 110 (नाबाद), 10 ऑगस्ट 2007
के. एल. राहुल, 149, 11 सप्टेंबर 2018
ऋषभ पंत, 114, 11 सप्टेंबर 2018
रोहित शर्मा, 127, 2 सप्टेंबर 2021
अंतिम लढतीविषयी…
तारखा : बुधवार, दि. 7 जून ते रविवार 11 जून 2023
सामन्याची भारतीय वेळ : दुपारी 3.30 पासून
राखीव दिवस : सोमवार, 12 जून
प्रतिस्पर्धी कर्णधार : पॅट कमिन्स आणि रोहित शर्मा
मैदान : केनिंग्टन ओव्हल, लंडन. क्षमता :23500
प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस, डिस्नी हॉटस्टार