पुणे – राज्यात 488 आदर्श शाळा विकसित करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शाळांच्या दुरुस्ती, पुनर्बांधणीसाठी व नवीन बांधकामासाठी 479 कोटी 48 लाख रुपये खर्चास शासनाकडून मान्यता मिळाली आहे.
विद्यार्थी संख्येनुसार वर्ग खोल्या, मुला-मुलीकरिता व सीडब्लूएसएनसाठी स्वतंत्र व पुरेशी स्वच्छता गृहे, पेयजल सुविधा व हॅंड वॉश स्टेशन, ग्रंथालय, संगणक कक्ष, व्हर्च्युअल क्लासरुम, शाळेला संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. लेखा शिर्षातील तरतूद वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी दिले.