मुंबई – अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा, मुलगी टीना आहुजा आणि मुलगा यशवर्धन आहुजासोबत दिसला. खरं तर गोविंदाच्या मुलाचा वाढदिवस होता. यानिमित्ताने संपूर्ण कुटुंबाने मिळून वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये गोविंदाच्या मुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
गोविंदा नुकताच मुलगा यशवर्धनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर पडला होता. यादरम्यान त्याची पत्नी आणि दोन्ही मुले पापाराझींसाठी पोज देताना दिसले. जिथे मुलगा वडिलांच्या कार्बन कॉपीसारखा दिसत होता, तर लेक आई सुनीतासारखी दिसत होती.
गोविंदाची मुलगी टीना आहुजाने या फोटोंमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे. टीना खूपच हॉट लूकमध्ये दिसली. टीना आहुजा आई सुनितासोबत ग्रीन मॅचिंग आउटफिटमध्ये दिसली. दोघेही खूप क्यूट दिसत होते.
टीना आहुजा हिला देखील सोशल मीडियावर काही युजर्सनी शॉर्ट कपडे परिधान केल्यामुळे ट्रोल केले होते. मात्र गोविंदाच्या कुटुंबीयांनी अशा नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष केले.
काही काळापूर्वी यशवर्धन त्याच्या वडिलांसोबत इंडियन आयडॉल 13 मध्ये दिसला होता. जिथे त्याने गोविंदाच्या गोरिया चुराना मेरा जिया या हिट गाण्यावर परफॉर्म केले.