शिक्रापूर – वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील एका महिलेस किरकोळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येथील मंगल शिंदे व अनिता शिंदे यांचा त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करण्यावरून किरकोळ वाद झाला होता.
त्यांनतर मंगल यांनी अनिताला शिवीगाळ करण्याबाबत विचारपूस केली असता, अनिता व तिचा पती श्रीमंत या दोघांनी अनिताला काठीने मारहाण केली. दरम्यान, शेजारील महिलांनी त्यांची भांडणे सोडवली. याबाबत मंगल बाळू शिंदे (वय 33), रा. नरेश्वर रोड वढू बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
शिक्रापूर पोलिसांनी अनिता श्रीमंत भंडारे व श्रीमंत नामदेव भंडारे दोघे (रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करत आहेत.