अभिनेता ‘सोनू सूद’च्या कामाचं राज्यपालांकडून कौतुक

राज्यपाल 'भगतसिंग कोश्यारी' यांनी फोन करून केलं सोनू सूदच कौतुक

मुंबई – बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार बॉडी आणि अभिनयात माहीर असलेला अभिनेता ‘सोनू सूद’ सध्याच्या कठीण काळातही लोकांच्या मनावर आधिराज्य करत आहे.  सोनूने अलीकडे आपले जुहूमधील हॉटेल करोनाविरोधात दिवसरात्र काम करत असलेल्या डॉक्‍टर, परिचारिका आणि पॅरा मेडिकल स्टाफसाठी उघडले होते.

त्यानंतर तो दररोज सुमारे 45,000 हून अधिक गरजू लोकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करीत आहे. तसेच, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची मोहिम सुद्धा सोनुने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत त्याने हजारो मुजरांना आपल्या राज्यामध्ये परत पाठवलं आहे.

दरम्यान, सोनू सूदच्या याच कामाचं राज्याचे राज्यपाल ‘भगतसिंग कोश्यारी’ यांनी फोन करून कौतुक केलं आहे. राज्यपालांनी सोनूला फोन केल्यानंतर त्याच्या ट्विटरवर यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. राज्यपपाल कोश्यारी यांच्या ट्विटला उत्तर देताना सोनूनं त्यांचे आभार मानत तुम्ही केलेल्या कौतुकामुळं काम करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली असल्याचंही त्यानं म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.