नवी दिल्ली – गुगल कंपनी विविध देशातील कर्मचाऱ्यांना करोनाची लस घेण्याचा आग्रह करीत आहे. जे कर्मचारी लस घेणार नाही त्यांना पगार दिला जाणार नाही आणि शेवटी त्यांना कामावरून कमी केले जाईल असे कंपनीने ठरविले असल्याचे एका वाहीणीने म्हटले आहे.
कंपनीने कर्मचाऱ्यांना लस घेतली आहे की नाही आणि घेतली नसेल तर त्याला वैद्यकीय किंवा इतर काय कारण आहे ते स्पष्ट करण्यास सांगितले आहे. 18 जानेवारीपर्यंत जे कर्मचारी लस घेऊन त्याची कागदपत्रे देणार नाहीत त्यांना रजेवर पाठविले जाईल आणि सहा महिन्यानंतर कामावरून कमी केले जाणार आहे, अशा प्रकारचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. मात्र याबाबत गुगल कंपनी स्वतः काही सांगितलेले नाही.