रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील दीड टीएमसी पाणी साठा असलेले तिसरे धरण कळमोडी आज रात्री १०० टक्के भरले आहे. धरणातून सुमारे ५०० पेक्षा जास्त क्यूसेस वेगाने आरळा नदीत पाणी सांडव्यावरून सुरु झाले आहे. यामुळे त्याखाली असलेल्या चासकमान धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. .
खेड तालुक्यातील कळमोडी, चासकमान, भामा आसखेड ही तीन धरणे आहेत. पैकी कळमोडी धरण आज (दि.१८) रोजी रात्री १०० भरले. १०० टक्के भरणारे पुणे जिल्ह्यातील हे पहिले धरण आहे. मागील वर्षी कळमोडी धरण ११ जुलै २०२२ रोजी १०० टक्के भरले होते तर मागील दोन वर्षांपूर्वी धरण १२ ऑगष्ट २०२१ रोजी शंभर टक्के भरले होते. मागील वर्षीच्या तुलनेत आठ दिवस उशिरा भरले आहे
कळमोडी धरणात सन २०१० पासून पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणास कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाहीत. धरण भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहते. कळमोडी धरण परिसरात गेली आठ दिवस पाऊस पडत असल्याने धरण भरले. कळमोडी धरणाच्या खाली असलेल्या चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात आता वेगाने वाढ होणार आहे.
कळमोडी धरणावर कर्मचारी रोहिदास नाईकडे, संभाजी बोंबले चोवीस तास लक्ष ठेवून आहेत. कळमोडी धरण भरल्याने कळमोडीचे माजी सरपंच हरिभाऊ गोपाळे, गणपत गोपाळे, माजी सदस्य दत्तात्रय गोपाळे तंटामुक्ती समितीचे सदाशिव शेलार,चिखलगावचे माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे यांनी समाधान व्यक्त केले.
खेड तालुक्यातील भामा आसखेड चास कमान व कळमोडी धरण क्षेत्रात झालेला पाऊस धरणातील पाणी पाणी पातळी टक्केवारी पुढील प्रमाणे