Entertainment : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या बाबत सध्या एक मोठीआनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच विराट कोहली आणि अनुष्का दुसऱ्यांदा आई-वडील होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. हे कपल लवकरच त्यांच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर करणार आहे. मात्र सध्या तर याबाबत या दोघांकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.
काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराटला मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर पापाराझींनी स्पॉट केले होते, परंतु दोघांनीही त्यांना फोटो लीक न करण्याची विनंती केली होती. याबाबत लवकरच घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच कारणामुळे अनुष्का बऱ्याच दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही. अंबानींच्या गणेश चतुर्थीच्या पार्टीतही हे जोडपे दिसले होते.
विराट आणि अनुष्काला त्यांचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायला आवडते. आपल्या मुलीचे फोटो क्लिक केल्याबद्दल अनुष्काने अनेकदा पापाराझींना फटकारले. या दोघांना दोन वर्षांची मुलगी असून तिचे नाव वामिका आहे. या जोडप्याने अद्याप आपल्या मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. एका मुलाखतीत विराटने सांगितले होते की, त्याने आणि अनुष्काने ठरवले आहे की जोपर्यंत तिला हे समजत नाही तोपर्यंत ते त्यांच्या मुलीचा चेहरा दाखवणार नाहीत. अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘चकडा एक्सप्रेस’मध्ये दिसणार आहे. ( anushka shrama second baby )