मुंबई – राज्यातील मद्यप्रेमींसाठी महागाईच्या काळात दिलासा देणारं वृत्त आलं असून राज्यातील ठाकरे सरकारने दारुवरील एक्साईज ड्युटी घटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दारु स्वस्त होणार आहे. तरी राज्य सरकारचे उत्पन्न वाढणार आहे.
आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केलीय. त्यामुळे राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झालीय, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.
स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली.
आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीतून सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. त्याच कारण म्हणजे एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल, असा अंदाज अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केल्यामुळे व्हिस्कीच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेला कमी किमतीत आयात स्कॉच मिळू शकणार आहे.