नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार शुक्रवारी भारतीय सराफात सोन्याच्या दरात शंभर रुपयांनी वाढ होऊन सोन्याचा दर 51812 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यासंदर्भात बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि अमेरिकेच्या कर्जरोखे यावरील परतावा कमी झाल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली सराफात शुक्रवारी चांदीचा दर मात्र 252 रुपयांनी कमी होऊन 67047 रुपये प्रती किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1931 डॉलर व चांदीचा दर 24.68 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. रशिया युक्रेन युद्धामुळे सोने आणि चांदीचे दर सध्या अस्थिर आहेत, युद्ध थांबण्याची शक्यता असल्यासच सोने आणि चांदीचे दर स्थिर होऊ शकतात, असे विश्लेषकांनी सांगितले.