मुंबई – कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादव व टीम साऊदी यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीनंतरही भानुका राजपक्षे व कागिसो रबाडा यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने 18.2 षटकांत सर्वबाद 137 धावा केल्या. निम्मा संघ 84 धावांत तंबूत परतल्यावरही राजपक्षे व रबाडाने उपयुक्त खेली करत समाधानकारक धावसंख्या उभारली.
– पंजाबची सुमार फलंदाजी
– कर्णधार आग्रवाल साफ अपयशी
– शेल्डन जॅक्सन व चामिका करुणारत्नेची उणिव भासली
– उमेश यादवच्या गोलंदाजीसमोर शरणागती
– धवनसह स्टार फलंदाजांकडून निराशा
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय अचुक ठरवताना यादवसह टीम साउदीनेही अफलातून स्पेल टाकला. पंजाबचा कर्णधार मयंक आग्रवाल पुन्हा एकदा वेगवान सुरुवात देण्यात कमी पडला. उमेशने त्याला पायचीत केले. या धक्क्यातून पंजाबचा संघ सावरलाच नाही. त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले व एकवेळ 5 बाद 84 अशी बिकट स्थिती बनली.
यावेळी श्रीलंकेचा स्टार फलंदाज भानुका राजपक्षे दावून आला व त्याने काही अविश्वसनीय फटकेबाजी करत 9 चेंडूत 3 चौकार व 3 षटकार फटकावताना 31 धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर पुन्हा एकदा उमेश यादवने साउदी, शिवम मावी व आंद्रे रसेलसह पंजाबच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
दक्षिण आफ्रिकेतून बारतात दाखल झाल्यावर या स्पर्धेपूर्वीचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेल्या कागिसो रबाडाने काही धाडसी फटके मारले व 16 चेंडूत 4 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 25 धावांची अमुल्य खेळी केली. त्यामुळेच पंजाबला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. कोलकाताकडून उमेश यादवने 4 तर, टीम साउदीने 2 गडी बाद केले. आंद्रे रसेल, शिवम मावी व सुनील नरेन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक – पंजाब किंग्ज – 18.2 षटकांत सर्वबाद 137 धावा. (भानुका राजपक्षे 31, कागिसो रबाडा 25, उमेश यादव 4-23, टीम साउदी 2-36, आंद्रे रसेल 1-0, सुनील नरेन 1-23, शिवम मावी 1-39).