नवी दिल्ली – मंगळवारी सोन्याचा दर 159 रुपयांनी कमी होऊन 51,373 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दरही 149 रुपयांनी कमी होऊन 66,485 रुपये प्रति किलो झाला.
सकाळच्या सत्रामध्ये रुपयाचा दर 24 पैशांनी वाढला होता. या घटनाक्रमाचाही सोन्याच्या दरावर परिणाम झाला असे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. जागतिक वायदे बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,926 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे.