Gold Silver Price : मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायाला मिळत आहे. त्यातच आज सोने-चांदीच्या दरवाढीतून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण मागच्या चार-पाच दिवसानंतर आज सोने आणि चांदीच्या दरा कोणतीही वाढ झालेली नाही.
आज सोने-चांदीचा दर स्थिर आहे. मुंबईत आज सोन्याचा भाव (Gold Rate Today) 22 कॅरेट सोन्यासाठी 5,885 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,420 रुपये प्रति ग्रॅम आहे.
आज जळगाव सुवर्ण नगरीमध्ये सोन्याचे दर 63100 आणि जीएसटीसह 6500 रुपये प्रति तोळा शुद्ध सोन्याचे दर आहेत. सोमवारपेक्षा 1200 रुपयांची घसरण झाली आहे. मुंबईत सोन्याचा दर 64 हजारांच्या पुढे आहे. जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडीचा हा परिणाम मानला जात आहे.
गुडरिटर्न्स (Goodreturns) वेबसाईटनुसार, आज 5 डिसेंबरला 18 कॅरेट सोन्याचा दर 48,150 रुपये प्रतितोळा आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 58,850 रुपये आहे. तर आज 24 कॅरेट सोन्याचा दर 64,200 रुपये प्रति तोळा आहे. आज सोन्याप्रमाणे चांदीचा दरही स्थिर (Silver Rate Today) असून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. आज सोमवारी एक किलो चांदीचा दर 80,500 रुपये आहे. गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरात वाढ झाली होती, आज मात्र यात काहीसा दिलासा मिळाला आहे.