नवी दिल्ली – युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर सेन्याच्या दरात एकतर्फी वाढ होत आहे. बुधवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 427 रुपयांनी वाढून 54,377 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 710 रुपयांनी वाढून 72,028 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. दरम्यान, गेल्या पंधरा दिवांपूर्वी सोन्याचे दर 48 हजारांवर होते, ते आता 54 हजारांवर गेले आहेत.
जागतिक बाजारात मात्र सोन्याचे दर काही प्रमाणात कमी पातळीवर होते. मात्र भारतील बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली. जागतीक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 2,045 डॉलर तर चांदीचा दर 26.43 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे. हा दर बऱ्याच वर्षानंतर 2 हजार डॉलरच्या पुढे गेला आहे.
युध्दामुळे देश विदेशातील नागरीक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे सोन्याची खरेदी वाढून सोन्याचे दर वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी आणि विश्लेषकांनी बोलताना सांगितले.