नवी दिल्ली – रशिया- युक्रेनदरम्यान रेंगाळलेले युद्ध आणि जागतिक पातळीवर महागाई वाढत असल्यामुळे व्याज दरात होणारी वाढ या कारणामुळे सोने आणि चांदीचे दर सध्या अस्थिर आहेत.या पार्श्वभूमीवर भारतीय सराफात बुधवारी सोन्याचा दर 258 रुपयांनी कमी होऊन 51,233 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. तयार चांदीचा दर 327 रुपयांनी कमी होऊन 64,618 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला होता.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,892 हॉलर व चांदीचा दर 23.36 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेला होता. विविध परिस्थितीजन्य कारणामुळे जागतिक बाजारात डॉलरचा दर आज वाढल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी झाल्याने सोन्याच्या दरात घट होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
युद्ध संपुष्टात येत नाही तोपर्यंत सोन्याचे दर अस्थिर राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील एक वर्ष अमेरिका व्याजदरात वाढ करणार असल्यामुळे सोन्याचे दर सध्याच्या पातळीवर राहतील किंवा त्यात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता त्यानी सूचीती केली.