मुंबई – बजाज फायनान्स कंपनीचा नफा शेवटच्या तिमाहीत मोठ्या प्रमाणात वाढूनही आज या कंपनीच्या शेअरचा भाव सात टक्क्यांनी कोसळून 6,716 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता.
या कारणामुळे कंपनीचे बाजार मुल्य एकाच दिवसात 31 हजार कोटी रुपयांनी कमी होऊन 4.06 लाख कोटी रुपये इतके झाले. चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा वाढून 2,420 कोटी रुपये या विक्रमी पातळीवर गेला होता. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला केवळ 1,347 कोटी रुपयांचा नफा झाला होता.