मुंबई – सोन्याच्या नवीन दराने आतापर्यंतचा सर्वात उच्चांक गाठला आहे.अमेरिकन बँकिंग सेक्टरवर आलेल्या संकटानंतर त्याचा परिणाम सोमवारच्या गोल्ड व्यापारावर देखील पाहायला मिळाला आहे. एमसीएक्सवर देखील सोन्याच्या किमतीने लाईफ टाइम हाय गाठला आणि 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे.
स्पॉट मार्केटमध्ये मजबूत मागणीमुळे आज ताज्या सोन्यात मोठ्या प्रमाणात खरेदी झाली, ज्यामुळे सोमवारी वायदा व्यवहारात सोन्याचा भाव 976 रुपयांनी वाढून 60,359 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 976 रुपयांनी किंवा 1.64 टक्क्यांनी वाढून 60,359 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. यासह चांदीच्या भावातही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
बाजारातील सकारात्मक ट्रेंडमध्ये व्यापार्यांनी केलेल्या नव्या खरेदीमुळे चांदीच्या दरात वाढ झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. जागतिक पातळीवर, न्यूयॉर्कमध्ये चांदीचा भाव 0.93 टक्क्यांनी वाढून 22.67 डॉलर प्रति औंस झाला.बँकिंग क्षेत्राची चिंता वाढल्याने सोन्याचा भाव 1 वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
राष्ट्रीय राजधानी सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 1,400 रुपयांनी वाढून 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील व्यवहारात सोने 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीचा भावही 1,860 रुपयांनी वाढून 69,340 रुपये किलो झाला.