नवी दिल्ली – जागतीक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे आणि रुपयाचे मुल्य सकाळच्या सत्रात वधारल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ नांदली गेली. दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याचा दर 269 रुपयानी वाढून 45,766 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 630 रुपयानी वाढून 59,704 रुपये प्रती किलो झाला. सकाळच्या सत्रात रुपयाचे मुल्य 32 पअषषंनी वाढले होते. रुपयाचे मुल्य वाढल्यानंतर सोन्याची आयात महाग होते.
जागतीक बाजारात सोन्याचा दर 1,759 डॉलर तर चांदीचा दर 22.58 डॉलर प्रति औंस या पातळीवर राहीला. सध्या जागतीक बाजारता विविध कारणामुळे अस्थिरता असल्यामुळे आगामी काही काळ सोन्याचे दर अस्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र सोन्याचे दर सध्या तुलनेने कमी पातळीवर असल्यामुळे भारतात आगामी काळात सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.