Yuvraj Singh – भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या ( Yuvraj Singh ) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गोव्याच्या पर्यटन विभागाने युवराजला नेमोरजिम हा व्हिला ‘होमस्टे’ म्हणून नोंदणी न करता चालवल्याबद्दल नोटीस दिली गेली आहे. त्याला ८ डिसेंबर रोजी सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. गोवा पर्यटन व्यवसाय कायदा १९८२ अंतर्गत नोंदणी केल्यानंतरच राज्यात ‘होमस्टे’ चालविला जाऊ शकतो. युराज सिंगने असे न केल्याने त्याला नोटीस पाठवण्यात आली आहे.
ऋषभ पंत टी-२० क्रिकेटमध्ये खेळवण्याचा पात्रतेचा आहे का? माजी खेळाडूचा सवाल!
नोटीसमध्ये युवराजला ( Yuvraj Singh ) पर्यटन व्यापार कायद्यांतर्गत मालमत्तेची नोंदणी न केल्याबद्दल दंडात्मक कारवाई का करू नये, असे कारण दाखवण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर तुमच्या निवासी जागेचा होमस्टे म्हणून वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. यामध्ये गोवा पर्यटन विभागाने युवराज सिंगच्या एका ट्विटचाही संदर्भ दिला आहे. त्यामुळे आता ८ डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीत युवराज सिंगबाबत काय निर्णय दिला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऋषभ पंत टी-२० क्रिकेटमध्ये खेळवण्याचा पात्रतेचा आहे का? माजी खेळाडूचा सवाल!
युवराज सिंगने ( Yuvraj Singh ) भारताकडून ४० कसोटी सामन्यांमध्ये ३ शतकांच्या मदतीने १९०० धावा केल्या, तर एकदिवसीय कारकिर्दीत त्याने ३०४ सामन्यांमध्ये १४ शतकांच्या मदतीने एकूण ८७०१ धावा केल्या आहेत. तसेच ५८ टी-२० सामन्यात त्याने ११७७ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये १६९, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाबाद ७७ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे.