प्राग : भारताचा युवा ग्रँडमास्टर बुध्दिबळपटू विदीत गुजराथीला प्राग बुध्दिबळ फेस्टिव्हल मास्टर्स स्पर्धेत दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेत अखेरच्या नवव्या फेरीअखेर विदीतसह पाच बुध्दिबळपटू प्रत्येकी ५ गुणांसह संयुक्तरित्या आघाडीवर होते. यातील दोन सर्वोत्कृष्ठ खेळाडू विदीत आणि १६ वर्षीय अलरेझा फिरोझजा हे प्ले-आॅफ मध्ये खेळले.
Firouzja Wins Prague Chess Festival Masters
GM Alireza Firouzja won the Prague Chess Festival's Masters tournament after beating GM Vidit Gujrathi 2-0 in a playoff. The two had the best tiebreak in a group of five players finishing on 5/9. Report:https://t.co/YxriZV2YCT
— Chess.com Community (@GreenPawns) February 21, 2020
प्ले-आॅफच्या लढतीमध्ये इराणच्या अलरेझा फिरोझजाने विदीतला हरवून विजेतेपद पटकावले आणि त्यामुळे विदीतला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
अन्य लढतीत भारताचा बुध्दिबळपटू पी हरिकृष्णा याने चेक गणराज्यचा डेविड नवारा याचा पराभव करत ४.५ गुणासह ७ वे स्थान पटकावले.