वायनाड/कलपेट्टा – देशभरात स्वत:च्या नावावर घर नसलेल्या अथवा बेघर व्यक्तींना स्वत:चे हक्काचे घर देण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार कटिबद्ध आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळच्या वायनाडमधील खासदार राहुल गांधींकडे स्वत:चे घर नसेल तर कलपेट्टा नगर पालिकेकडे आम्ही अर्ज करून राहुल गांधींना पंतप्रधान घरकुल योजनेत घर देण्यासाठी विनंती करत आहोत, असे कलपेट्टा भाजपने म्हटले आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील नवा रायपूर येथे झालेल्या कॉंग्रेस महाअधिवेशनात संबोधित करताना म्हटले होते की, माझ्याकडे 52 वर्षांपासून घर नाही. या प्रकरणावरून राजकीय खळबळ माजली आहे. भाजप आता वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना टोमणे मारत आहे.
वृत्तानुसार, वायनाडमधील भाजपने कलपेट्टा नगरपालिकेच्या सचिवांना राहुलसाठी घर मिळावे यासाठी अर्ज पाठवला आहे. या अर्जात कॉंग्रेस खासदाराचे नाव प्रधानमंत्री घरकुल योजनेत समाविष्ट करून त्यांना घर आणि जमीन उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वायनाड भाजपचे जिल्हाध्यक्ष केपी मधू यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आणि म्हटले की, ते कॉंग्रेस नेत्याला कलपेट्टा येथे घर आणि जमीन देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे घर जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात असावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मधु यांनी टोमणे मारली की वायनाडमध्ये घर असणे ही राहुल गांधींसाठी एक आदर्श परिस्थिती असेल कारण ते सुट्टी घालवण्यासाठी येथे येत येत असतात, भलेही त्यांना वायनाडच्या विकासाची कसलीच चिंता नसेल.
वर्ष 2019 मध्ये राहुलने सादर केलेल्या 15 कोटींहून अधिक संपत्तीशी संबंधित प्रतिज्ञापत्र शेअर करताना, असे मानले जाते की केरळमधील सीपीएम सरकारला घरासाठी लाइफ मिशन योजनेअंतर्गत गांधींना घर उपलब्ध करून द्यायचे होते. वर्ष 2014 मध्ये राहुल गांधींची व्यक्तिगत मालमत्ता सुमारे 9 कोटी रुपयांची होती. मात्र, त्यात एकाही घराचा समावेश नाही. आता ही मालमत्ता 15 कोटींच्या पुढे गेली तरीही त्यांच्याकडे घर नाही, असे मधू म्हणाले. असे असेल तर राहुल गांधी कोणाच्या घरात भाड्याने राहतात, तेही पहावे लागेल.