जॉन अब्राहमला बाईकचे किती वेड आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या सुपरबाईकचे मोठे कलेक्शन आहे. वेगवेगळ्या मॉडेलच्या अनेक सुपरबाईक त्याने खरेदी करून ठेवल्या आहेत. त्या बाईकवर तो अनेकवेळा रायडिंग करताना आढळतो. सुपर बाईकचे वेड तर अर्शद वारसीलाही आहे. त्यानेही काही टॉप क्लास मोटरसायकली जमा केल्या आहेत. आता जॉन अब्राहमने आपल्या कलेक्शनला अर्शद वारसीबरोबर शेअर करायचे ठरवले आहे. अलिकडेच जॉनने एक टॉप एंड सुपर बाईक अर्शद वारसीला गिफ्ट केली.
नवीन वर्षाच्या निमित्ताने जॉनीने आपल्या मित्राला ही गिफ्ट दिली आहे. हे अर्शद वारसीसाठी मोठे सरप्राईज होते. अर्शद वारसी आणि जॉन अब्राहम “पागलपंती’मध्ये एकत्र होते. तेंव्हापासून ते आधुनिक मॉडेलच्या बाईकसंदर्भात तासनतास चर्चा करत बसलेले असायचे. जेंव्हा जॉनला टॉप एंड सुपरबाईक दिसली, तेंव्ह त्याने या बाईकचा फोटो लगेच अर्शदला पाठवला. त्यालाही ही बाईक आवडली. जॉन स्वतःच्या कलेक्शनमध्ये आणखी एक सुपर बाईक जमा करणार का, असे अर्शदने विचारले असता जॉनने ही बाईक आपण स्वतःसाठी नव्हे तर अर्शदसाठी घेणार असल्याचे सांगितले.