नवी दिल्ली – लोकांना फिट ठेवण्यासाठी रेल्वेने एक भन्नाट कल्पना आणली आहे. मशीनसमोर जोर बैठका काढा आणि मोफत प्लॅटफॉर्म तिकीट मिळवा, असा अनोखा प्रयोग आता रेल्वेकडून करण्यात आला आहे. याबाबतची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरून दिली.
भारतीय रेल्वेच्या ‘फिट इंडिया’ उपक्रमाअंतर्गत दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर एक मशीन लावण्यात आले आहे. या मशीनसमोर जोरबैठका काढल्याने मोफत फ्लॅटफॉर्म तिकीट मोफत मिळते. मात्र, या मशीनसमोर जर तुम्ही १८० सेकंदांमध्ये म्हणजेच ३ मिनिटांमध्ये ३० जोर बैठका मारल्या तरच तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट मोफत मिळणार आहे.
रशियन रेल्वे स्टेशनवरील ‘squat and ride’ मशीन पाहिल्यानंतर भारताची राजधानी दिल्लीत असा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Exercise & Get Free Platform Ticket: Indian Railways has embarked on a novel initiative to encourage fitness at Anand Vihar Railway Station in Delhi.
Platform tickets will be given free of charge to those who exercise using the ‘Squat Kiosk’ installed. pic.twitter.com/4DlqDdRATc
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 21, 2020