नगर – महापालिकेची सर्वसाधारण सभा येत्या शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत दहा कोटींच्या विशेष निधीतून रखडलेल्या रस्त्यांच्या कामांचा विषय सभेच्या अजेंड्यावर घेण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत अग्निशमन विभागासाठी लागणारी साधनसामग्री खरेदी करण्यासाठी निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसह पाठविण्याबाबत विकास समितीमार्फत महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत अनुदान व तांत्रिक मंजुरी तसेच महासभेची मंजुरी, पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त निधीतून कामे करण्यासाठी खर्चाची मंजुरी देणे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दहा कोटी रुपयांच्या प्रस्तावित विकासकामांची तांत्रिक मान्यता मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे मनपाने भरलेली बारा लाख 50 हजार रुपये मनपाकडे वर्ग करणे, 70 व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निधी मिळणे, सावेडी भागात स्मशानभुमी उपलब्ध करून देण्यासाठी भूसंपादन करणे या महत्वाच्या मुद्द्यांवर सभेत चर्चा होणार आहे.