पाचगणी – जंगलाच्या अधिवासातून गव्याने महाबळेश्वरच्या वेण्णा लेकवर दर्शन दिल्याने पर्यटकांना धक्का देणारी गव्याची सफारी कुतुहलाचा विषय झाला आहे. सकाळी कमी वर्दळीच्या वेळी अचानक रस्त्यावर अवतरलेल्या गव्यामुळे पर्यटकांसह सर्वसामान्य नागरीकांची चांगलीच धांदल उडाली. महाबळेश्वरच्या घनदाट जंगलातुन गव्याचा शहराच्या रस्त्यावर अचानक प्रवेश झाल्यामुळे पर्यटकांसह नागरिक घाबरले.
महाबळेश्वरमधील ‘वेण्णा’लेकवर गव्याची सफारी pic.twitter.com/RiYRR5tAcI
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 26, 2022
हिवाळ्यात गव्यांना अन्नाच्या शोधात जगलांच्या अधिवासातून शहराकडे येण्याचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. गव्याने दर्शन दिल्यानंतर वेण्णा लेकवरील वन विभागाच्या हद्दीतील स्टॅालच्या पाठीमागील घनदाट जगंलात गवा पुन्हा लुप्त झाला. बऱ्याच लोकांना गव्याच्या दर्शनाचा आनंद लुटला. गव्याचे भल्या सकाळी वेण्णा लेक येथे झालेले दर्शन सर्वसामान्य नागरिक व पर्यटकांना एक विलोभनीय पर्वणीच मानली जात आहे.