मुंबई : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्या चांगल्याच संकटात सापडल्या आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या विरोधात देशातील अनेक भागात लॊकांनी जमाव जमवून निदर्शने केली आहेत. त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. अशातच भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर तसेच क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी याबाबत ट्विट करीत प्रस्तिक्रिया दिली आहे.
Silence of so called ‘secular liberals’ on the sickening display of hatred & death threats throughout the country against a woman who has apologised is surely DEAFENING! #LetsTolerateIntolerance
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) June 12, 2022
यापैकी भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने ट्विट करीत या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करीत म्हंटले आहे की, ‘माफी मागणाऱ्या महिलेविरुद्ध देशभरात द्वेषाचे भयंकर प्रदर्शन आणि तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर तथाकथित ‘सेक्युलर लिबरल’चे मौन वेडे ठरणार आहे.’ अशा आशयाचे ट्विट गौतम गंभीरने केले आहे.
Violence is not the answer no matter what the provocation is!
— Irfan Pathan (@IrfanPathan) June 12, 2022
तर दुसरीकडे क्रिकेटपटू इरफान पठाण यानेही ट्विट करीत म्हंटले आहे की, ‘हिंसा हे उत्तर नाही’ अशा आशयाचे ट्विट इरफान पठाण याने केले आहे.
दरम्यान नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद चिघळत चालल्याचे दिसत आहे. भाजपने त्यांची पक्षाच्या सदस्यत्वातून हकालपट्टी केली असली नुपूर यांच्या विरोधात निदर्शने चालूच आहेत. एवढेच काय अतिरेक्यांकडूनही त्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. MIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी तर त्यांना फाशी देण्याची मागणी केली होती. यावरून भाजप पक्षावरही टीकांचा भडीमार सुरु आहे.