मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ तसेच बॉलिवूडचे खलनायक म्हणून ज्यांनी ओळख आहे असे शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर अडचणीत सापडला आहे. सिद्धांत कपूरवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे.
बंगळुरूमध्ये छापा टाकून बंगळुरू पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे.
Karnataka | Actor Shraddha Kapoor’s brother Siddhanth Kapoor detained during police raid at a rave party in a Bengaluru hotel, last night. He is among the 6 people allegedly found to have consumed drugs: Bengaluru Police pic.twitter.com/UuHZKMzUH0
— ANI (@ANI) June 13, 2022
“ड्रग्स सेवनात दोषी ठरलेल्या ६ लोकांमध्ये सिद्धांत एक आहे. हे सर्व लोक बंगळुरूमधील एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये होते, जिथे ही पार्टी सुरु होती. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचून छापा टाकला”, अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणात अजून श्रद्धा कपूर किंवा तिचे वडील शक्ति कपूर यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. सिद्धांत आधी ड्रग्स प्रकरणात दीपिका पदुकोणपासून रिया चक्रवर्तीसह अनन्या पांडे, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची चौकशी करण्यात आली होती.