मुंबई – अभिनेता टायगर श्रॉफ अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. खासकरून टायगर त्याच्या अॅक्शन आणि फिटनेससाठी ओळखला जातो. टायगरने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक अॅक्शन चित्रपट केले आहेत. सध्या तो त्याच्या आगामी ‘गणपत: भाग १’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगरने नुकतेच या अॅक्शन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सोशल मीडियावर त्याने याबाबत माहिती दिली आहे.
या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यानंतर टायगरने त्याचा एक लूकही शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझ्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात आव्हानात्मक चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस!…2 महिने बाकी आहेत. याशिवाय त्याने गणपथ आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांना हॅशटॅगही टॅग केला. त्याच्या शर्टलेस फोटोंमध्ये अभिनेता खूपच आकर्षक दिसत होता. गळ्यात साखळी आणि सनग्लासेस घालून त्याने आपला लूक पूर्ण केला. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकरांनी देखील लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, ‘गणपत’ एक अँक्शन थ्रीलर चित्रपट यामध्ये टायगर सोबत अभिनेत्री क्रिती सेनन आणि बिग बी अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमीकेत दिसणार आहे. ‘गणपत’ हा दोन भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यातील पहिल्या भागाची घोषणा करण्यात आलीये.
View this post on Instagram
चित्रपटाचा पहिला भाग म्हणजे गणपत पार्ट एक 2023च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज केला जाणार आहे. टायगर श्रॉफची पहिली पॅन इंडिया फिल्म असणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू , कन्नड आणि मल्याळम भाषेत देखील प्रदर्शित केला जाणार आहे.