यवतमाळ – जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे ४५ वर्षीय महिलेला नराधमांनी एकट्यात गाठून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या अत्याचाराचा अश्लील व्हिडीओ काढून तक्रार केल्यास व्हिडीओ व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी दिली. असे म्हणत हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला गेला असून महिलने १८ दिवसानंतर पोलिसात तक्रार दाखल केली.
महिलेचे सुनेसोबत वाद झाले असता रागाच्या भरात ती भावाच्याकडे जाण्यास निघाली. मात्र तिकीटासाठी पैसे नसल्याने ते मजुरीचे पैसे घेण्यासाठी डेहणी शिवारातील शेतात जात होती. दरम्यान शिवरात ही महिला एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यात आले व यावेळी व्हिडिओ काढून पोलिसात तक्रार दिली तर तुझा अश्लील व्हिडीओ व्हायरल करून जीवाने ठार केले जाईल, अशी धमकी आरोपींनी दिली. यानंतर महिलेने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली. या गंभीर प्रकाराने घाबरलेल्या महिलेने तिच्या आजीकडे दिग्रस तालुक्यातील सावंगा येथे आश्रय घेतला. मात्र आरोपींनी तो व्हिडीओ व्हायरल केला. याघटनेविषयी महिलेच्या पतीला सुद्धा ही घटना माहीत झाली. पतीने याबाबत पत्नीकडे विचारणा केली असती तिने हा घडलेला प्रकार सांगितला.
या घटनेप्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अमोल प्रल्हाद आठवले व आकीब खाॅ वाजीद खाॅ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.