वाघोली – पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी गणेश सातव यांची निवड झाली असून निवडीचे पत्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते सातव यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी आघाडी मध्ये विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावे यासाठी विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केलेल्या विद्यार्थी व गुणवंत शिक्षकांचा यथोचित सन्मान गेल्या दहा वर्षात सातव पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातव यांनी उत्तम कामकाज केले. वाघोली गावचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर वाघोली मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष पदी बाळासाहेब सातव पाटील यांची निवड झाली. त्यानंतर गणेश सातव पाटील यांची युवकच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.
याप्रसंगी माजी महापौर अंकुश काकडे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे चे अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहरचे अध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राकेश कामटे, मनोज पाचपुते,अजिंक्य पालकर, आदी मान्यवर उपस्थित होते.