पुणे- लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रमिज मुल्ला (वय 30, रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत) असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकणी 30 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिस कर्मचारी मुल्ला कोंढवा पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. चार वर्षांपूर्वी मुल्ला याची फिर्यादी तरुणीसोबत ओळख झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर त्याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवले. आमिषाने त्याने तिच्यावर बलात्कार केला. विवाहासंदर्भात तरुणीने विचारणा केल्यानंतर मुल्लाने टाळाटाळ केली. यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी मुल्ला विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोंढवा पोलिस अधिक तपास करीत आहेत.