वाघोली – वाघोली तालुका हवेली येथील गणेश नगर मदर मेरी साईराज पार्क आदर्श पार्क समर्थ पार्क एकाई सोसायटी आदी भागातील नागरिकांसाठी महावितरण कडून सुरू असलेला वीज पुरवठा जास्तीच्या वीज भारा मुळे ट्रांसफार्मर जळाला होता.
या भागातील नागरिकांसाठी 100 के व्ही डीपी द्वारे वीज पुरवठा चालू होता मात्र गेल्या काही दिवसांपासून जास्तीच्या वीज भारा ची मागणी वाढत असल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता. तसेच उपलब्ध असणारा वीज पुरवठा देखील कमी दाबाने होत असल्याने नागरिक वारंवार चिंतातुर झाले होते.
वाघोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी महावितरणचे शाखा अभियंता उपअभियंता तसेच कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता यांच्याकडे 200 केव्ही ट्रांसफार्मर बसविण्याबाबत मागणी केली होती या मागणीचा विचार करून महावितरणचे कार्यकारी अभियंता बुंदेले, उप अभियंता अमित भरते, शाखा अभियंता गणेश श्रीखंडे आदींनी याकामी सहकार्य करत नवीन 200 केव्हीं ट्रान्सफॉर्मर बसवून नागरिकांची विजेची समस्या सोडवली आहे.
वाघोली तालुका हवेली येथील गणेश नगर च्या भागातील नागरिकांसाठी असणारा 100 केव्हि वीज पुरवठा करणाऱ्या ट्रांसफार्मर अति विजेच्या मागणीमुळे वारंवार खंडित होत होता. हा ट्रांसफार्मर जळाल्यावर तातडीने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागणीचा विचार करून तातडीने 200 ट्रांसफार्मर बसून सहकार्य केले असून विजेची समस्या त्याद्वारे सुटली आहे. या भागात अजून एक जास्तीचा महावितरणच्या सहकार्याने जवळपास 100 के व्ही चा ट्रांसफार्मर बसवण्यात येणार आहे. यासाठी लागणारी जागा नागरिकांच्या सहकार्याने महावितरण ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. -संदीप सातव, माजी उपसरपंच ग्रामपंचायत वाघोली