मुंबई – अभिनेता सनी देओलचा गदर 2 मधील फर्स्ट लूकही समोर आला होता. ज्यामध्ये तो त्याच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत होता. फर्स्ट लूक समोर आल्यापासून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. ट्रेलर कधी रिलीज होणार याबाबत कोणतीही माहिती नसली तरी निर्मात्यांनी गदरबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
गदर एक प्रेम कथा 2001 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्या काळात विक्रमी कमाई केली होती.आता ‘गदर 2’ यावर्षी 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. परंतु तब्बल 22 वर्षांनंतर गदर 1 हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याचे समजते. चित्रपटाच्या निर्मिती कंपनीने अधिकृत निवेदन जारी केले आहे. ‘गदर एक प्रेम कथा’ हा चित्रपट गदर २ च्या आधी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे तो 2001 मध्ये ज्या तारखेला रिलीज झाला होता त्याच तारखेला तो रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी 15 जून 2023 रोजी रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे अनेकांनी गदरची पूर्ण कहाणी समजेल.
गदर 2 चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहे, जो ‘गदर: एक प्रेम कथा’ मध्ये बालकलाकार होता. मात्र ‘गदर 2 मध्ये तो आता नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘गदर 2’ साठी तब्बल 100 कोटींचा खर्च आल्याची देखील सध्या चर्चा आहे.