सनी देओलचा ‘गदर 2’ केवळ हिट होण्याच्या दिशेने नाही तर हिंदी चित्रपटांचे अनेक विक्रम मोडण्यासाठी सज्ज आहे. सर्व अंदाज झुगारून या चित्रपटाने शुक्रवारीच असे कलेक्शन केले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पहिल्याच दिवसापासून तुफान कमाई करणारा ‘गदर 2’ अनेक मोठे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झाला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘गदर २’चे यश हा ‘गदर’ किती मोठा ब्रँड आहे याचा पुरावा आहे. 22 वर्षांनंतर या सीक्वलला मोठ्या संख्येने प्रेक्षक मिळत आहेत. पहिल्या दोन दिवसांतच ‘गदर 2’ ने बॉक्स ऑफिसवर 80 कोटींहून अधिक कमाई केली आहे. शुक्रवारी, चित्रपटाने चांगली ओपनिंग घेतली आणि शनिवारी पहिल्या दिवसापेक्षा जास्त कमाई केली. आता रविवारचा ट्रेंड सांगतोय की तिसऱ्या दिवशी ‘गदर 2’चं कलेक्शन प्रचंड गाजणार आहे.
‘गदर 2’ रविवारी अर्धशतक ठोकणार –
शुक्रवारी रिलीज होण्यापूर्वी ‘गदर 2’ची आगाऊ बुकिंग जोरदार होती. पहिल्या दिवशी या चित्रपटाची 7 लाखांहून अधिक तिकिटे आगाऊ बुक करण्यात आले होते. तर शनिवारी हा आकडा जवळपास 6.3 लाख होता. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 कोटींहून अधिक कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी 43 कोटींची कमाई केली होती.
रविवारच्या चित्रपटाचे आगाऊ बुकिंग शुक्रवारच्या तुलनेत 50% पेक्षा जास्त आहे. सनीचा चित्रपट तिसऱ्या दिवशी 48 कोटींचा गल्ला जमवण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद इतका जबरदस्त आहे की रविवारी ‘गदर 2’चे कलेक्शन 50 कोटींच्या घरात जाऊ शकते.
बॉक्स ऑफिसवर पहिल्या रविवारी सर्वात दमदार चित्रपटांमध्ये शाहरुख खानचा ‘पठाण’ सर्वात वर येतो. त्याच वर्षी रिलीज झालेल्या, शाहरुखच्या कमबॅक चित्रपटाने पहिल्या रविवारी 58.5 कोटी रुपये कमवले. यानंतर यशचा बॉक्स ऑफिस मॉन्स्टर ‘KGF 2’ आहे. गेल्या वर्षी आलेल्या या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या रविवारी 50.35 कोटींचा गल्ला जमवला होता. प्रभासच्या ‘बाहुबली 2’ने पहिल्या रविवारी 46.5 कोटी आणि सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ने 45.53 कोटींची कमाई केली. पहिल्या रविवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये आमिर खानचा ‘दंगल’ पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या रविवारी 41.34 रुपयांचे निव्वळ कलेक्शन झाले होते.
‘गदर 2’ने रविवारी 50 कोटींची कमाई केली तर तो ‘बाहुबली 2’ला सहज मागे टाकेल. सनीचा चित्रपट ‘KGF 2’ च्या संडे कलेक्शनलाही मागे टाकू शकतो.दोन दिवसांत 83 कोटींहून अधिक कमाई करणारा ‘गदर 2’ पहिल्या वीकेंडमध्ये सहज 130 कोटींपर्यंत कमाई करू शकतो. सनी देओलच्या चाहत्यांच्या नजरा आता रविवारी ‘गदर 2’ अर्धशतक ठोकू शकतो की नाही याकडे असेल.