पुणे -करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातील दोन्ही पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सुधारित वेळापत्रक नंतर कळविण्यात येणार आहे, अशी माहिती विभागप्रमुख प्रा. उज्ज्वला बर्वे यांनी दिली. दोन्ही अभ्यासक्रमांची परीक्षा दि. 7 व 8 एप्रिल रोजी होणार होती.
त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाने लेखी व मौखिक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.