राजगुरूनगर (प्रतिनिधी) – सातकरस्थळ ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या 33 दिव्यांग बांधवांना 5 टक्के निधीतून प्रत्येकी सात हजार रुपये प्रमाणे 2 लाख 31 हजार रुपये निधी लोक नियुक्त सरपंच ऋतिका सातकर,उपसरपंच मयूर जगदाळे यांच्या हस्ते धनादेशाद्वारे वाटप करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ सदस्य अजय चव्हाण, निलेश अरबूज, प्रमोद सुपे, स्वाती सातकर, अमिता सातकर, नयना काळे, जयश्री पडवळ, वर्षा देवरे ग्रामसेवक निलेश पांडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातकरस्थळ पश्चिम येथे महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले. उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अक्षदा थिटे, आशा सेविका अपर्णा सातपुते, सुनयना सैद, शिवव्याख्यात्या अॅड. क्रांती कराळे, सदस्य अजय चव्हाण, प्रमोद सुपे, नयना काळे, निलेश अरबुज,अमिता सातकर, स्वाती सातकर, जयश्री पडवळ, वर्षा देवरे, ग्रामसेवक निलेश पांडे, साहेबराब सातकर, आकाश सातकर, अभिजित सातकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयना काळे यांनी तर स्वाती सातकर यांनी आभार मानले.