शेवगाव, ( प्रतिनिधी) – मुस्लिम समाजातील वधूवरांचा परिचय मेळावा शेवगावमध्ये प्रथमच आयोजित करून समाजातील तरुण पिढीला चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे . अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून समाजापुढे आदर्श निर्माण होणार असून, त्याचा समाजाला लाभ मिळणार आहे . हा अभिनव उपक्रम निश्चितपणे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले .
शेवगाव येथील उम्मीद सोशल फाउंडेशन व राॅयल रिश्ता मॅरेज ब्यूरो यांच्या वतीने शहरातील मदिना फंक्शन हाॅल नाईकवाडी मोहल्ला येथे आयोजित मुस्लिम समाज वधू – वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या उपक्रमात राज्यासह परराज्यातून देखील एकूण ७६५ युवक- युवती आपल्या परिचय पत्रासह सहभागी झाले होते .
वसीम मुजावर यांंनी प्रास्ताविक केले .मौलाना मुफ्ती अब्दुल रज्जाक अध्यक्षस्थानी होते. यावेळी जनशक्तीचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे, मौलाना कलीमुल्ला काझी , माजी सभापती अरुण पाटील लांडे, केदारेश्वरचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, रिजवान शेख, फिरोज पठाण , पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकिल, भाजप प्रदेश चिटणीस अरुण मुंढे,
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष ताहेर पटेल, अशोक शिंदे , संजय फडके , इरफान पटेल , मौलाना युनुस साहब , रामभाऊ साळवे, हाजी युसूफ पठाण, जाकिर कुरेशी,रिझवान शेख, प्यारेलाल शेख, रोहन फडके, पोष्षाअण्णा कडमिंचे , सलीम मुजावर, हाजी यूसुफ शेख , कपिल शेख, वहाब शेख, समीर शेख, राॅयल मॅरेज ब्यूरोचे प्रमुख कलिम शेख आदी उपस्थित होते.