मुंबई – सध्या दारू पिणे हा अनेकांचा छंद बनला आहे. दारूची नशा अशी आहे की जानेमाने लोक रस्त्यावर येऊन धिंगाणा घालतात. जगात असे अनेक लोक आहेत जे दारू पिल्याशिवाय राहू शकत नाहीत. दारू पिऊन अनेकजण घरात आणि बाहेर गोंधळ घालतात. तर, अनेकजण रस्त्यावर जोरदार गाडी देखील चालवतात. त्यामुळे जगातील अनेक देशांनी दारूशी संबंधित कायदे केले आहेत, ज्याचे उल्लंघन केल्यास लोकांना शिक्षा होऊ शकते. शिवाय, दंडही आकारला जातो. आता पर्यंत अनेकांनी दारूच्या नशेत आपला जीवसुद्धा गमावला आहे.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक तरुण दारूच्या नशेत पूर्णपणे झिंगला असून तो आगीच्या शेजारी उभा असल्याचं दिसत आहे. त्या सोबतच त्याचे आणखी दोन मित्र देखील तिथे उभे आहेत.
View this post on Instagram
मात्र, दारूच्या नशेत असलेला तरुण डुलक्या खात असतानाच खाली कोसळतो आणि शेकोटीत पडतो. घटना घडल्यानंतर लगेच बाजूला असलेल्या त्याच्या मित्राने या तरूणाला उचललं आणि तो यामधून वाचला. दरम्यान, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. तसेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील झाल्याचं दिसून आलं आहे.