कोरेगाव भीमा -प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख यांचय मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशमधील 263 मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी पीएमपीएमएसच्या 10 बसमधून पुणे रेल्वे स्टेशनकडे रवाना करण्यात आले.
नावांची नोंदणी ते त्यांना रेल्वेमध्ये बसवून देण्यापर्यंत कोरेगावच्या तलाठी अश्विनी कोकाटे यांनी परिश्रम घेतले. नाव नोंदणीसाठी कृती सदस्य मधुकर कंद यांनी यादी तयार केली.
गट विकास अधिकारी ढवळे, सहायक उपनिरीक्षक अविनाश थोरात, सचिन मोरे व मंडळ अधिकारी सी. एम. ढवळे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, पोलीस पाटील मालन गव्हाणे यांचे परप्रांतीयांनी आभार मानले.