आळंदी ते पुणे व्हीलचेअरवरून वारी

पुणे –
पूर्वजन्मीं सुकृतें थोर केलीं।
तीं मज आजि फळासि आलीं।।
मायबाप बंधु सखे सोयरे ।
यांतें भेटावया मन न धरे ।।
एकएका तीर्थहूनी आगळें ।
तयामाजी परब्रह्म सांवळे ।।
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळयांचे स्वागत पुण्यात करण्यात आले. यामध्ये सांगवीचे दिव्यांग असणारे गणेश बागुल त्यांच्या सहकाऱ्यांसह पाच वर्षांपासून आळंदी ते पुणे वारी व्हीलचेअरवर करतात.

“गेल्या पाच वर्षांपासून वारी करत आहे. दरवर्षी वारीची ओढ लागते. मार्ग लहान असेल तरी वारीमुळे वर्षभर पुरेल एवढा उत्साह आणि ऊर्जा मिळते. त्यामुळे आनंदाने वारीमध्ये सहभागी होतो’, अशी भावना गणेश बागुल यांनी व्यक्‍त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.