अयोध्या सुनावणी : निर्मोही आखाड्यातर्फे प्रतिपादन
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयापुढे आज पासून अयोध्य प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. त्यावेळी निर्मोही आखाड्यातर्फे त्यांची बाजू मांडायला सुरूवात झाली. यावेळी या आखाड्याच्यावेळी सांगण्यात आले की अयोध्येतील ढाच्यात 1934 पासून कोणाहीं मुस्लिमांना प्रवेश करण्यास अनुमती नाकारण्यात आली असून हा ढाचा पुर्णपणे आमच्याच ताब्यात आहे.
निर्मोही आखाड्यातर्फे सुशिल जैन यांनी त्यांची बाजू मांडली. ही सगळी वास्तू आणि त्या भोवतीच्या परिसराचे व्यवस्थापन पुर्णपणे निर्मोही आखाड्याकडेच देण्यात यावे अशी मागणीही त्यांनी कोर्टापुढे केली. त्यांनी नमूद केले की हा खटला प्रामुख्याने या परिसराची मालकी, ताबा आणि व्यवस्थापनाशी निगडीत आहे.राम जन्म स्थानाच्या आतील बाजुचा ताबा गेले अनेक शतके आखाड्याकडेच आहे असेही यावेळी नमूद करण्यात आले.
राम जन्मस्थानाच्या आतील कोर्ट यार्डही आमच्या ताब्यात असून या परिसरात सीता रसोई, चबुतरा, भंडार गृह हा भाग येतो आणि त्याचा ताबाही आमच्याचकडे आहे असेही या आखाड्याच्यावतीने आज सांगण्यात आले. दरम्यान या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करावे अशी गोविंदार्चायांनी कोर्टाकडे केलेल्या मागणीला निर्मोही आखाड्याच्यावतीने विरोध करण्यात आला.