लंडन – इंग्लंडच्या ऍशेस मालिका जिंकण्याचे स्वप्नास तडा गेला आहे. त्यांचा हुकमी द्रुतगती गोलंदाज जेम्स अँडरसनने दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे.
अँडरसनने आतपर्यंत कसोटी करिअरमध्ये 575 गडी बाद केले आहेत. गेले महिनाभर त्याला तंदुरुस्तीच्या समस्येने ग्रासले आहे. येथे मंगळवारी त्याची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला किमान आठवडाभर विश्रांतीची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळेच त्याला दुसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागणार आहे. त्याच्या जागी जोफ्रा आर्चरला संधी मिळण्याची शक्यता आहे.
मात्र तोदेखील अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्याला स्नायूंच्या वेदनांचा त्रास होत आहे. त्याच्या तंदुरुस्तीची चाचणी घेण्यासाठी त्याला ससेक्स इलेव्हनबरोबर सराव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट हा मात्र आर्चरच्या सहभागाबाबत आशावादी आहे.